मनसे लोकसभा निवडणूक या चिन्हावर लढणार?

0

मुंबई,दि.21: मनसे लोकसभा निवडणूक लढणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच यावर बैठक झाली होती. मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास ठरले आहे. अशातच मनसेचा उमेदवार शिवसेनेच्या (शिंदे गट) धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे वृत्त ZEE 24 तासने दिले आहे. मुंबईत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील दीड तासांपासून ही बैठक सुरु आहे. 

मनसे आणि महायुतीमध्ये रोज बैठका होत आहे. नुकतंच राज ठाकरे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी विनोद तावडे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेही उपस्थित होते. यादरम्यान काय चर्चा झाली याचा खुलासा दोन्ही पक्षांनी केला नव्हता. एक ते दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता मुंबईत राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह बैठक सुरु आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here