भाजपा नगरसेवक आणि महापालिका आयुक्तांमध्ये झाली जोरदार बाचाबाची

0

लखनऊ,दि.29: लखनऊ महापालिकेत सभागृहाच्या कामकाजादरम्यान मोठा गदारोळ झाला. यादरम्यान भाजपा नगरसेवकाने महापालिका आयुक्तांवर एक टिप्पणी केली, त्यावर महापालिका आयुक्त म्हणाले- मी तुला मारेन. यानंतर सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. गोंधळातच महापौरांनी भाजपा नगरसेवकाला सभागृह आमची आई आहे आणि तुम्ही तिच्यावर बलात्कार करत आहात, असे सांगितले. प्रकरण इतके वाढले की नंतर पोलिसांना पाचारण करावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वास्तविक काल लखनौ महापालिकेत सभागृहाचे कामकाज सुरू होते. शहर स्वच्छतेसाठी निवडण्यात आलेल्या कंपनीबाबत एकमत होण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र ही बैठक शिवीगाळ आणि धमक्यांनी गाजली. प्रत्यक्षात सभेत भाजपाचे नगरसेवक रामनरेश रावत यांनी थेट महापालिका आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावर महापालिका आयुक्तांचा ताबा सुटला. दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर महापौरही भाजपा नगरसेवकावर संतापले. 

शिवीगाळ

प्रकरण इतके वाढले की नगरसेवक आणि इतर लोकांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांना बघण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. यावर उर्वरित नगरसेवकांनी रामनरेश रावत यांना हाकलून लावले आणि नंतर पोलिसांना पाचारण केले.

असे सांगितले जात आहे की, भाजपा नगरसेवक रामनरेश रावत यांनी महापालिका आयुक्त इंद्रजीत सिंह यांच्यावर टीका करताना म्हटले, तुम्हाला काय ऑफर मिळाली? त्यावर महापालिका आयुक्त संतप्त झाले. दरम्यान, लखनऊच्या महापौर सुषमा खरवाल यांनीही नगरसेवकाला खडसावत महापालिका ही आमची आई असून तुम्ही तिला फाडत आहात, असे सांगितले. चालता हो. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here