पंतप्रधान म्हणून लोकांची कुणाला पसंती? ओपिनियन पोलमधून समोर आली ही माहिती

0

मुंबई,दि.24: पंतप्रधान म्हणून लोकांची कुणाला पसंती? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आणि लोकांना थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर ते कोणाला निवडतील असा प्रश्न विचारला.

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. या निवडणुकांपूर्वी जनतेला आकर्षित करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी भाजप आणि विरोधी इंडिया आघाडी बैठका घेत आहेत. दरम्यान, सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आणि लोकांना विचारले की जर त्यांना थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर ते कोणाला निवडतील?

या प्रश्नाच्या उत्तरात 59 टक्के लोकांनी सांगितले की, ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून देतील. 32 टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची निवड करणार असल्याचे सांगितले. 4 टक्के लोकांनी सांगितले की ते दोन्ही निवडणार नाहीत आणि 5 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना माहित नाही.

प्रत्येक राज्यात लोकांना हे प्रश्न विचारण्यात आले, ज्यामध्ये बहुतेक राज्यांमध्ये लोकांनी पंतप्रधान मोदींना आपली पहिली पसंती म्हणून घोषित केले आहे. ज्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्या राज्यांबद्दल बोलताना छत्तीसगडमधील 67 टक्के लोकांनी सांगितले की, जर त्यांना थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर ते पंतप्रधान मोदींनाच निवडतील. या राज्यात 29 टक्के लोकांनी राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं मत व्यक्त केलं.

मध्य प्रदेशात 66 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींना आपली पहिली पसंती असल्याचे म्हटले आहे. येथे 28 टक्के लोकांना राहुल गांधी पंतप्रधान बनवायचे आहेत. राजस्थानमध्ये 65 टक्के लोकांनी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून आणण्याचे तर 32 टक्के लोकांनी राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं मत व्यक्त केलं आहे.

कोणाला निवडाल?

• नरेंद्र मोदी- 59 टक्के

• राहुल गांधी – 32 टक्के

• दोन्ही नाही – 4 टक्के

• माहित नाही – 5 टक्के


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here