रूपाली चाकणकर यांना महिला आयोग पदावरून हटवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

0

सोलापूर,दि.11: महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सम्राट बळीराजा यांचे सोशल मीडियावर काल्पनिक पोस्ट केल्याने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना महिला आयोग अध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र तसेच देशाच्या अनेक राज्यांमधील शेतकरी वर्ग सम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतो. दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी आपल्या शेतामध्ये बळीचे पूजन करतो. इतिहासकाळात या बळीराजाला वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारल्याचे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या गुलामगिरी ग्रंथात सिद्ध केले आहे.

असे असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी फेसबुक या सोशल माध्यमावर बळीराजाच्या मस्तकावर वामन पाय देऊन उभे असल्याचे काल्पनिक चित्र प्रसारित करुन तमाम मराठा, बहुजन शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता चाकणकर या आपल्या महिला आयोग या संविधानात्मक पदाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनावर दबाव आणून खोटी माहिती देत प्रश्न विचारणाऱ्यांवर कारवाई करण्याचा दबाव टाकत असल्यामुळे त्यांना या पदावरून हटविण्यात यावे.

तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, उपशहर प्रमुख सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, ज्योतिबा गुंड, रमेश चव्हाण, शुभम थिटे, शेखर कन्टीकर, नागनाथ कोरे, राजेंद्र माने आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here