मुंबई,दि.३: Assembly Election Results 2023: मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि राजस्थान (Rajasthan) या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत असून, २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. २०१८ मध्ये या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र नंतर भाजपाने मध्य प्रदेशमधील काँग्रेसचं सरकार पाडून सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे आता या दोन राज्यात मतदारांनी कुणाला कौल दिलाय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सुरुवातीच्या कलांमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस, तर मध्य प्रदेशमध्ये भाजपा आघाडीवर
आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस २७ आणि भाजपाने २२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने ३५ आणि काँग्रेस २८ जागांवर आघाडीवर आहे.
राजस्थानमध्ये कॉंग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होताना दिसत आहे. कॉंग्रेसचे ६१ तर भाजपचे 70 उमेदवार आघाडीवर आहेत. या तुलनेत अपक्ष उमेदवारांनी येथे बाजी मारली आहे. तब्बल १२ अन्य पक्षांचे उमेदवार येथे आघाडीवर आहेत. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे.
छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची आघाडी, भाजपवर मात
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचे 30 उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजप मात्र काहीशा पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. कॉंग्रसचे २५ उमदेवार आघाडीवर आहेत. येथे कॉंग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत रंगली आहे.
तेलंगणामध्ये बीआरएसची घौडदौड सुरु, कॉंग्रेसही आघाडीवर
तेलंगणामध्ये कॉंग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. येथे बीआरएसचे 20 तर कॉंग्रेसचे २५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, एमआयएमचा 1 उमेदवार आघाडीवर आहे.