खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओचा वॉच, एका महिन्यात दीड लाखांचा दंड

0

सोलापूर,दि.25: दिवाळीच्या काळात जास्तीचे भाडे आकारणार्‍या आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणार्‍या ट्रॅव्हल्ससह विविध खासगी वाहने अशी 12 वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. आरटीओने विशेष मोहीम राबवीत 20 ऑक्टोंबर ते 20 नोव्हेंबर या एका महिन्यात अनेक खासगी वाहनांची तपासणी केली असून 1 लाख 41 हजार 900 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आरटीओच्या पथकाकडून वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासह चालकांची सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. यासोबतच वाहनांतील अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन दरवाजा, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत आहे का, हे तपासले गेले. आसनव्यवस्था यातील अनधिकृत बदल, मोटार वाहन कायद्यातील तरतुद उल्लंघन करणार्‍या दोषी बसचालक व मालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

प्रवासादरम्यान मनमानी भाडे आकारणार्‍या अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या संबंधित खासगी बससंदर्भात नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी. दोषी आढळल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आरटीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here