भविष्य निर्वाह निधीने EPFO खातेदारांना दिला सावधानतेचा इशारा

0

दि.१०: भविष्य निर्वाह निधीने म्हणजेच EPFO ने खातेदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ईपीएफओने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. एपीएफओचे लाखो खातेधार आहेत. या पार्श्वभूमीवर एपीएफओने खातेदारांना सतर्क केले आहे. तुमचे EPF खाते असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. चुकूनही EPF शी संबंधित नंबर कोणालाही शेअर करू नका. आपला वैयक्तिक तपशील आणि विशिष्ट क्रमांक कोणाशीही शेअर करू नका, असे म्हणत ईपीएफओने सर्व खातेधारकांना सतर्क केले आहे. ईपीएफओने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

आधार क्रमांक, पॅन क्रमांक, यूएएन क्रमांक, बँक खाते तपशील आणि ओटीपी यांसारखे वैयक्तिक तपशील ईपीएफओ कधीही खातेधारकाकडे मागत नाही. तुमच्याकडून जर कोणी फोन करून किंवा सोशल मीडियावरून अशा नंबरची मागणी करत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगा आणि असे तपशील कोणाशीही शेअर करू नका. चुकूनही हे नंबर कोणाशीही शेअर करू नका, असं आवाहन EPFO आपल्या ऑफिशल ट्विटर हँडलवरून केलं आहे.

पगारदार व्यक्तीसाठी त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम खूप महत्त्वाची असते. या रकमेतून तुम्ही तुमच्या निवृत्तीचे नियोजन करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे पैसे भविष्यासाठीही सुरक्षित ठेवू शकता. विशेष म्हणजे या निधीवर सरकारकडून व्याजही दिले जाते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here