भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

0

मुंबई,दि.6: भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य खेळ पुरस्कार समिती यांच्याकडून उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या, महाराष्ट्र राज्य खेळ पुरस्कार समिती अध्यक्ष राजकपूर बागडी ,आयोजक विशाल जाधव आधी व मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी आलेल्या पुरस्कारांना क्रीडा क्षेत्राबद्दल माहिती व महत्त्व आणि मार्गदर्शन केले.

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रच्या सचिव मीनाक्षी गिरी यांना माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या शुभहस्ते मानपत्र व समानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, मिनाक्षी गिरी यांनी टेनिस क्रिकेट महाराष्ट्र खेळाचा प्रचार प्रसार व खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य खेळ पुरस्कार 2023 चा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

मिनाक्षी गिरी याना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट फाउंडर कन्हैया गुज्जर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, विलास गिरी, स्वप्निल ठोंबरे, धनंजय लोखंडे, संदिप पाटिल, मानस पाटिल, सिध्देश गुरव, दर्शन थोरात, ओमकार पवार, सुमित अणेराव, कुणाल हदळकर गणेश भालेराव यांनी यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here