गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला 2 जणांना चिरडलं

0
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला

गुहागर,दि.28: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला 2 जणांना चिरडलं. देशभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणपती मिरवणूक निघाली आहे. पण रत्नागिरीमधील गुहागरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला. या दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गुहागरमधील पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन दरम्यान मिरवणुकीत ही दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झालेला टेम्पो मिरवणुकीत घुसल्याने 15 हून अधिक भाविक जखमी झाले आहे. यात दोन जणाचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

गुहागरमधील पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन दरम्यान मिरवणुकीत ही दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झालेला टेम्पो मिरवणुकीत घुसल्याने 15 हून अधिक भाविक जखमी झाले आहे. यात दोन जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दीपक भुवड आणि कोमल भुवड (वय 17) अशी मृतांची नावं आहे.

आगर इथं सार्वजनिक गणरायाला वाजत गाजत निरोप दिला जात होता. रस्त्याच्या बाजूने मोठ्या संख्येनं तरुण आणि तरुणी ढोल ताशाच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. गणरायाची विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे जात होती. पण अचानक एक टेम्पो मिरवणुकीत घुसला. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण अचानक झालेल्या या घटनेमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here