सोलापूर,दि.16: नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी तसेच दंड कमी करण्यासाठी पंधरा हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून 5 हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.
पंढरपूर वीज वितरणच्या लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ अटक
याप्रकरणी श्रीकांत भीमराव आवाड यास अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराचे किराणामालाचे दुकान असून यामध्ये नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी तसेच सदर तक्रारदाराने शेजारून दुकानासाठी वीज घेतल्यामुळे त्यास 70 हजार रुपयांचा दंड झाला होता. हा दंड कमी करण्यासाठी तसेच नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी आवाड याने 15 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी मध्ये पाच हजार रुपये लाच देण्याचे ठरले.
याप्रकरणी तक्रारदाराने पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पद्मावती मंदिरा नजीक असणाऱ्या ग्रामीण कार्यालयात आव्हाड याने 5000 रुपयाची लाज स्वीकारल्यावर त्यास अटक करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पो.शि. रियाज शेख, दिनेश माने, मंगेश कांबळे