सोलापूर,दि.१३: शेतात महिलेवर अत्त्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने कथित आरोपीस जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, मौजे घोडेश्वर येथील रहिवासी सिध्देश्वर भाऊसाहेब कावळे याने दि. ०९/०५/२०२३ रोजी शेतात काम करणा-या महिलेस गाडीवर येवून शारिरिक संबंधाची मागणी केली व त्यास त्या महिलेने नकार दिला असता, यातील आरोपी सिध्देश्वर भाऊसाहेब कावळे याने तिचा हात पकडून जबरदस्तीने तिला उसाच्या शेतात नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यावेळी त्या महिलेचा आवाज ऐकून तिचे नातेवाईक तेथे आले तेव्हा त्यांना पाहून आरोपी पळून गेला, अशा आशयाची फिर्याद कामती पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती.
सदर आरोपी सिध्देश्वर भाऊसाहेब कावळे यास दि. १७/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आली. आरोपीने ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत जामीनाचा अर्ज सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला.
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर आरोपीचे सदर फिर्यादीसोबत प्रेमसंबंध होते.
सदर आरोपी हा फिर्यादीच्या सांगण्यावरुनच फिर्यादीस भेटण्याकरिता आला होता. हा प्रकार फिर्यादीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास विरोध केला व फिर्यादीस मारहाण करुन आरोपी नामे सिध्देश्वर भाऊसाहेब कावळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यास दबाव आणला. सदर फिर्यादीने तिच्या कुटुंबियांच्या दबावास बळी पडून सदरची फिर्याद दाखल केलेली आहे तसेच प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषामधील स्वइच्छेने केलेले शारिरिक संबंध हे बलात्काराच्या व्याख्येत येत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारची फिर्याद दबावापोटी दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर युक्तीवादाच्या वेळेस आरोपीच्या वकिलांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवाडे दाखल केले.
शेतात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर
सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सदरील आरोपीस सत्र न्यायालय सोलापूर यांनी रुपये ५०,०००/- च्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचा आदेश पारित केला.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. राम शिंदे, ॲड. फैय्याज शेख, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.