Dhirendra Shastri Controversy: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

सीकर,दि.१३: Dhirendra Shastri Controversy: धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी दलित समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रसिद्ध कथावाचक आणि बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी दलित समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. धीरेंद्रशास्त्री यांच्या वक्तव्यामुळे बसोर या दलित समुदायाचा अपमान झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर आता बसोर समाजाकडून अनुसूचित जाती आणि जनजाती अधिनियमांतर्गत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरु केला आहे.

काय म्हणाले धीरेंद्र कृष्ण शास्त्री? | Dhirendra Shastri Controversy

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रशास्त्री या त्यांच्या दिव्य दरबारात युवकासह बोलत होते. बाबा बागेश्वर यांनी काढलेल्या एका चिठ्ठीवर या युवकाने आक्षेप घेतला. त्यावर बाबा बागेश्वर भडकले. त्यानंतर त्यांनी युवकाला आव्हान दिलं. त्यावेळी युवक म्हणाला की मी ब्राह्मण आहे. त्यावेळी बाबा म्हणाले मग मी काय बसोर आहे का? यानंतर हा युवक आणि बाबा यांच्यात बराच वाद झाला. धीरेंद्रशास्त्रींनी २ सप्टेंबरला हे वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२ सप्टेंबरला धीरेंद्रशास्त्री हे सीकरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी हे घटना घडली आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर छतरपूरच्या दलित समाजाने पोलीस ठाण्यात धीरेंद्रशास्त्रींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

राजस्थानातल्या सीकरमधल्या मंचावरून बागेश्वर बाबांनी आमच्या समाजाचा अपमान केला असा आरोप आता बसोर समाजाने केला आहे. धीरेंद्रशास्त्रींविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर देशभरात आंदोलन करू आणि बसोर समाज सोडून बौद्ध धर्म स्वीकारू असंही म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here