मुंबई,दि.९: PM Modi On Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केले आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने विरोधी पक्षांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
खासदारांशी मोदींनी साधला संवाद | PM Modi On Sharad Pawar
“काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही,” असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केल्याचं सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितलं. महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील ( एनडीए ) खासदारांशी मोदींनी संवाद साधला. तेव्हा मोदींनी हे विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं.”
“सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. नंतर निवडणूक प्रचारावेळी या नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली. काँग्रेसप्रमाणे भाजपा अहंकारी नाही. २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार,” असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.