लसीकरण नाही तर पगार नाही, कार्यालयात प्रवेश नाही महाराष्ट्रातील या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

0

नागपूर,दि.4: लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लवकरात लवकर लस देण्यात यावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

कोरोना विरुद्ध लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी प्रशासनाने हळूहळू कठोरता आणत दोन डोस घेणे, अनिवार्य केले आहे. दोन डोस (Covid vaccine) न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आलेत. विभाग प्रमुखांना याची खातरजमा करून अहवाल सादर करावा. 30 नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात किमान पहिल्या डोसचे 100% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश, आज जिल्हाधिकारी विमला आर. (Nagpur Collector Vimala R) यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये या संदर्भात केंद्र-राज्य शासकीय-निमशासकीय सर्व आस्थापनांच्या विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन या सूचना देण्यात आल्या.

कॉलेजमध्ये प्रवेश, विद्यार्थ्यांची उपस्थिती, कॉलेज उपक्रमातील सहभाग, यासाठी विद्यार्थ्यांनाही लसीकरणाची सक्ती प्रशासनाने करावी. वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहे, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. जनतेशी संपर्क येणाऱ्या प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण 100% झालेच पाहिजे. जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट घेण्यात यावे, यामध्ये कोणताही कसूर राहता कामा नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लसीकरण नसेल तर… पगार नाही, कोणत्या शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयात प्रवेश नाही !

सवलत, लाभ, योजना, सहभागासाठी लसीकरण अनिवार्य

जिल्हाधिकारी आर विमल यांचे नागपुरातील राज्य, निमशासकीय कार्यालयांना निर्देश

30 नोव्हेंबरच्या आत 100 टक्के उद्दीष्ठ पूर्ण करा

कोरोना विरुद्ध लढ्यात लसीकरण आवश्यक

कर्मचाऱ्यांना डोस पूर्ण केल्याशिवाय वेतन नाही

कॉलेज प्रवेश, परीक्षा,सहभागासाठी अनिवार्यता

मिशन मोडवर काम करण्याचे यंत्रणेला निर्देश


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here