रजनीकांत यांचा अन्नात्थे चित्रपट रिलीज, चाहत्यांची पहाटे-पहाटे फर्स्ट शोसाठी उसळली गर्दी

0

मुंबई,दि.4: सुपरस्टार रजनीकांतचा चित्रपट हा त्यांच्या चाहत्यांसाठी सणापेक्षा कमी नाही. रजनीकांत यांचा चित्रपट रिलीज व्हायची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहतात. आपल्या आवडत्या हिरोचा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतात. सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांचा अन्नात्थे (Annaatthe) सिनेमा आज रिलीज झाला आहे. रजनीकांत यांच्या सिनेमांची लोक उत्सुकतेने वाट पाहत असतात. अन् आज हा सिनेमा रिलीज झाला आहे. मुंबईत रजनीकांत यांच्या चाहत्यांनी अन्नात्थेचा फर्स्ट डे फर्स्ट शो (First Show) पाहण्यासाठी सकाळीच थिएटरमध्ये गर्दी केली आहे.

दिवाळी असो वा नसो , थलैवाचा चित्रपट एखाद्या सणापेक्षा कमी नाही. आमच्यासाठी ही दिवाळीची ट्रीट आहे, असं रजनीकांत यांची चाहती रम्या हिनं प्रतिक्रिया दिली आहे.

अन्नात्थे सिनेमात रजनीकांत यांच्यासह नयनतारा, खुशबू, मीना, किर्ती सुरेश आणि जगपती बाबूदेखील दिसतील. या सिनेमाला इम्मान यांनी म्युझिक दिलं असून वेट्री यांनी या सिनेमाचे छायांकन केलं आहे. या सिनेमाच्या काही भागांचे शूटिंग हे हैद्राबादमध्ये झाले आहे तर काही भागाचं शूटिंग हे कोलकतामध्ये पार पडलं आहे.

विदेशात भारतासह सिनेमा होणार रिलीज

अन्नात्थे हा सिनेमा 1 हजार 100 पेक्षा अधिक थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. विदेशात प्रदर्शित झालेल्या तमिळ सिनेमांपैकी हा सगळ्यात मोठा बिग बजेट सिनेमा असल्याची माहिती सन पिक्चर्सनं दिली आहे. अन्नात्थे’च्या निर्मात्यांनी ट्विट केलं की, ‘अन्नात्थे’ सिनेमा अमेरिकेतील 677 थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसंच अरबमधील 117 थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. तर मलेशियातील 110 त्यासोबत श्रीलंकेतील 86 थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. कॅनडामधील 17 तर यूनायटेड किंगडममधील 35 त्यासोबत यूरोपमधील 43 तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमधील 85 थिएटरमध्ये ‘अन्नात्थे’ प्रदर्शित होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here