मुंबई,दि.७: Raj Thackeray Meets Eknath Shinde: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मनसे आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना हे एकत्र येत असल्याचा चर्चा सुरु असतानाच अचानक राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती, त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला होता. आज राऊत यांनी मनसेसोबत युतीवर उद्धव ठाकरेंशी काल चर्चा झाल्याचे सांगितले होते.
राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला | Raj Thackeray Meets Eknath Shinde
यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु होती. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. परंतू, आज वेगळेच घडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले आहे. वर्षा बंगल्यावर ही पूर्वनियोजित भेट असल्याचे सांगितले जात आहे. वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे आल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदेंनी केलेले बंड शमत नाही तोच अजित पवारांनी राजकीय धुळवड उडवून दिलेली आहे. ज्य़ा अजित पवारांच्या नावे खडे फोडून शिंदे गट बाहेर पडलेला त्याच पवारांना सत्तेत सोबत घेतल्याने राजकीय समीकरणे वर्षभरातच बदललेली आहेत. आता पुढील वर्षभरासाठी काय काय राजकीय समीकरणे बदलतात याबाबत कोणीही काहीही सांगू शकत नाहीय, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.