Mahesh Kothe Solapur: सोलापुरात आयटी पार्क, सात ते आठ महिन्यात प्रत्यक्ष कंपनी सुरू होईल: महेश कोठे

0

सोलापूर,दि.30: Mahesh Kothe Solapur: सोलापुरात आयटी पार्कची घोषणा माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी केली होती. याकरिता महेश कोठे प्रयत्नशील होते. कोठे यांनी शरद पवार यांच्याकडे त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. कोठे यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

पत्रकार परिषदेत आयटी पार्कसंदर्भात महेश कोठे यांनी माहिती दिली. आर्यनस ग्रुप ऑफ कंपनीचे मनोहर जगताप यावेळी उपस्थित होते. सोलापुरात आयटी पार्क करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत होती. सोलापुरात आयटी पार्क नसल्याने अनेक तरुणांना नोकरीकरिता मुंबई, बंगळुरू येथे जावे लागत होते.

Mahesh Kothe Solapur

2 ऑगस्ट रोजी डोणगाव रोडवरील महेश कोठे यांच्या 75 एकर जागेमध्ये शरद पवार यांच्या हस्ते या आयटी पार्कचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

Mahesh Kothe Solapur | सात ते आठ महिन्यात प्रत्यक्ष कंपनी सुरू होईल: महेश कोठे

या ठिकाणी आयटीसी संलग्न अशा विविध कंपन्या आणल्या जातील तसेच रोबोट तयार करणारी कंपनी इथे येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या सात ते आठ महिन्यात प्रत्यक्ष कंपनी सुरू होईल असे देखील कोठे म्हणाले. तीन महिन्यात तीन हजार तर तीन वर्षात तीस हजार युवकांच्या हाताला मिळणार काम असल्याची माहिती महेश कोठे यांनी दिली. आयटी पार्क सुरू झाल्यानंतर सोलापुरातील तरुणांना नोकरी करता इतर शहरात जाण्याची गरज भासणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here