मुंबई,दि.24: HSC Exam Result 2023: बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
HSC Exam Result 2023 | गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
असा पहा ऑनलाईन निकाल
या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येईल निकाल
पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे (25 मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.
मागील वर्षी लागलेल्या निकालाची टक्केवारीदरम्यान गेल्या वर्षी २०२२ला ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातून दोन लाख ४२ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील ९३.६१ टक्के म्हणजेच दोन लाख २७ हजार ०२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.तर पुणे विभागीय मंडळात सोलापूर जिल्ह्यातील ९४.८३ टक्के विद्यार्थी पास होत सोलापूरने बारावीच्या निकालात बाजी मारली होती. तर पुणे जिल्ह्यातील ९२.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. एकूण निकालात विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी २.७७ टक्क्यांनी जास्त होती. मात्र यावेळी ऑफलाईन पध्दतीने घेतलेल्या परीक्षेत कोण बाजी मारणार हे उद्या दुपारीच कळणार आहे.