मुंबई,दि.2: Aksha Kamboj On Mohit Kamboj: भाजपा नेते मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा करण्यात आला होता. संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा व्हिडिओ संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केला होता. या व्हिडीओमध्य सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्याबाबत दावा करत आहेत. “लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत”, असा दावा त्यांनी केला आहे. रात्री साडेतीन वाजता त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे.
हेही वाचा Mohit Kamboj: भाजपा नेते मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन…
यांनी 29 एप्रिल रोजी पहाटे खार पश्चिम, लिंक रोड येथे घडलेल्या घटनेकडे लक्ष वेधत भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबाबत मोठे विधान केले. बारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली होत्या. त्यांच्या गराड्यात भाजपचे नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते असा आरोप राऊतांनी केला. त्यावर संबंधित महिलेने खुलासा केला आहे.
अक्षा कंबोज यांनी ट्विटरद्वारे दिले स्पष्टीकरण | Aksha Kamboj On Mohit Kamboj
अक्षा कंबोज यांनी ट्विटरद्वारे मोहित यांच्यावर होणाऱ्या आरोपावर भाष्य केले आहे. अक्षा कंबोज म्हणाल्या की, कौटुंबिक मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी शनिवारी रात्री रेडिओ बारमध्ये मोहित कंबोज भारतीय सोबत मी एकमेव मुलगी होते, कोण काय म्हणत आहे याने फरक पडत नाही. खोट्या बातम्या, चुकीच्या अफवा कधीही टिकणार नाहीत असं तिने म्हटलं.
अक्षा कंबोज कोण आहे?
अक्षा कंबोज या मोहित कंबोज यांच्या पत्नी असून स्वत: उद्योजिकाही आहेत. मोहित यांच्या रिसोर्ट, हॉटेल आणि अनेक प्रॉपर्टीत बहुतांश कामकाज अक्षा सांभाळतात. काही कंपन्यांमध्ये अक्षा संचालिका आहेत. अक्षा कंबोज यांनी मॅनेजमेंटमधून पदवीचं शिक्षण घेतले आहे. सेलेब्रिटी क्रिकेट लीगच्या सदस्या आहेत.
काय आहे प्रकरण?
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कंबोज यांच्यावर आरोप केले होते. मुंबईत रेस्टॉबार साधारण १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना खार येथील ‘रेडिओ’बार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. आतील धिंगाण्याचा आजूबाजूच्या परिसराला त्रास होऊ लागला. बाहेर वाहतूककोंडी झाली म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांनाच धक्काबुक्की झाली. बारमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली होत्या. त्यांच्या गराड्यात भाजपचे नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते. कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र कंबोज हे पोलिसांशी अर्वाच्य भाषेत बोलू लागले. याप्रकरणी हॉटेल व बाहेरचे सीसी फुटेज पोलिसांनी तपासावेत. कारण ही बाब कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे अमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती. खार येथील हा बार कोणाच्या मालकीचा आहे. त्याचा तपास करून पोलिसांनी कारवाई करावी आणि बारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.