Sharad Pawar On Maharashtra Politics: काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, असे आमदार…

0

नागपूर,दि.16: Sharad Pawar On Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटणार असल्याचेही बोलले जात आहे. यावर आता शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांच्यीशी चर्चा केली आहे. काही लोक दबावाला बळी पडू शकतात. मात्र, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. महाविकास आघाडीत फूट पडणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आम्ही भेटलो, प्रदीर्घ चर्चा झाली. महाविकास आघाडी आणि आणि राज्यातील राजकारण यासंदर्भात बोललो. त्या चर्चेत हा विषय नक्कीच आलेला आहे. की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षाचे नेते फोडायचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. आमदार फोडले. आदित्य ठाकरे यांनी यावर खुलासा केलाय, कसे नेते रडत होते. आम्हाला तुरुंगात जायचं नाही. तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरत आहेत.

काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे | Sharad Pawar On Maharashtra Politics

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही लोकांबाबत ही चर्चा आहे, हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे. कुठल्या प्रकारचा आहे. यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे, असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणाले आहेत.

पवार कुटुंबियांना अशा पद्धतीच्या नोटीस आल्या आहेत. त्यांच्या घरातील कुटुंबातील घरावर धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांच्या कुटुंबावरील चौकशीचा ससेमीरा लावलेला आहे. आम्ही त्यातून भरडून निघालो. मात्र, आम्ही झुकणार नाही. शरद पवार यांनी ते सांगितलं की आम्ही झुकणार नाही की पक्ष म्हणून त्यात जाणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here