मुंबई,दि.१४: कुत्र्याविरोधात तक्रार | कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार देण्यात आली आहे. एका भटक्या कुत्र्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. एका भटक्या कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने त्या कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आहे. कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने काही महिलांनी थेट कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार केली. तसंच मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या या कुत्र्याविरोधात कारवाई करा अशीही मागणी केली.
हेही वाचा Monkey Video: माकडाने भजन सुरू झाल्यावर असे काही केले की लोक पाहतच राहिले
कुत्र्याविरोधात तक्रार | कुठे घडली घटना?
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत असं दिसतं आहे की मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचं पोस्टर कुत्र्याने फाडलं. एका भिंतीवर हे पोस्ट होतं जे कुत्र्याने फाडलं. त्यानंतर या कुत्र्याच्या विरोधात विजयवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्स नुसार स्वतःला विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या दसारी उदयश्री यांनी उपहासात्मक पद्धतीने ही तक्रार दाखल केली आहे. काही महिलांना घेऊन त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यांनी पोलिसांना सांगितलं की व्हायरल व्हिडिओत कुत्रा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पोस्ट फाडतो आहे त्यामुळे त्या कुत्र्याच्या विरोधात कारवाई करा.
उदयश्री यांनी माध्यमांना हे सांगितलं की जगनमोहन रेड्डी यांच्या विषयी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांचा पक्ष १५१ जागा जिंकून सत्तेवर आला आहे. अशा मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडून कुत्र्याने त्यांचा अपमान केला आहे. राज्याच्या सहा कोटी लोकांचा या कुत्र्याने अपमान केला आहे. आम्ही पोलिसात या भटक्या कुत्र्याविरोधात तक्रार दिली आहे तसंच पोलिसांना हेदेखील सांगितलं आहे की लवकरात लवकर या कुत्र्याला जेरबंद करा कारण आमच्या राज्याच्या प्रिय मुख्यमंत्र्यांचा या कुत्र्याने अमपान केला आहे.