अमरावती,दि.3: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाले आहेत. भाजपाला मोठा धक्का बसला आहे. अशातच आणखी एक धक्का भाजपाला बसला आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
धीरज लिंगाडे पाटील यांना आघाडी | Dhiraj Lingade Patil
दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत धीरज लिंगाडे यांना आघाडी मिळाली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव झाला आहे. कोटा पूर्ण केला नाही पण मते अधिक असल्याने धिरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी लिंगाडे यांच्या विजयाची घोषणा केली आहे. धीरज लिंगाडे पाटील यांना 46 हजार 344 मते मिळाली. तर रणजित देशमुख यांना 42 हजार 962 मते मिळाली आहेत. अत्यंत चुरशीच्या या लढतीत लिंगाडे पाटील यांनी अखेर बाजी मारली आहे.
कोण आहेत धीरज लिंगाडे ?
▪️जन्म तारीख: 10 एप्रिल 1972
▪️शिक्षण: BA. LLB
▪️1998 ला नगरसेवक म्हणून पहिल्यांदा काँग्रेसकडून विजयी
▪️2010 ला शिवसेना बुलढाणा जिल्हाप्रमुख
▪️पुढे शिवसेनेमध्ये कार्यरत
▪️2023 ला विधानपरिषद निवडणूकीआधी काँग्रेसमध्ये प्रवेश