नबाब मलिक हे पाकिस्तानमधील ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत : नितेश राणे

0

सिंधुदुर्ग,दि.२४: भाजपचे नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक पाकिस्तानचे एजंट असून, पाकिस्तानमधील ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. NCB ने आर्यन खानवर कारवाई केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक एनसीबीवर आरोप करत आहेत.

नितेश राणे सिंधुदुर्गात मीडियाशी बोलत होते. नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट झालेले आहेत. पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ते ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाले आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे, हे त्यांना कळत नाही, या शब्दांत नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केला. 

शिवसेनेची सत्ता असताना समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे. मराठी माणसांविषयी शिवसेनेला काहीच पडलेले नाही. मुंबईमध्ये स्वतःला हिंदू म्हणवून घेणे हे पाप झाले आहे. ठाकरे सरकारच नाव बदलून बेईमान सरकार नाव ठेवायला हवे, असा टोला लगावत पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कसे कसे आणि कोणाकडून हफ्ते घेतात हे मी अस्लम शेख यांना पत्र लिहून कळवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. आमच्याकडे पुरावे आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here