Samir Thigale: मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांना खंडणी मागत हवेत गोळीबार

Samir Thigale: पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी

0

पुणे,दि.22: पुणे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्यावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे (Pune District MNS President Samir Thigale) मनसेत कार्यरत आहेत. कुख्यात गुंडानी हा गोळीबार केला आहे. कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

धमकी देत पैशाची मागणी | Samir Thigale

गुंडानी समीर यांना धमकी दिली. त्यासोबतच पैशाची मागणी देखील केली. “मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे.

हेही वाचा Deepak Kesarkar: ‘एक ना एक दिवस उद्धव ठाकरेंना याची जाणीव होईल, आपण काय…’: दीपक केसरकर

पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही… | MNS Samir Thigale

कुख्यात गुंडाने समीर यांच्या दिशेनं गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत गोळीबार केला. यावेळी समीर थिगळे यांचं कुटुंब घटनास्थळी हजर होतं. गुंडानी त्यांंच्यासमोरच समीर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या सगळ्या घटनेत मात्र कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

मागील काही वर्षांपासून समीर हे मनसेत कार्यरत आहे. पक्षाच्या कामात ते चांगलेच सक्रिय आहेत. त्यांची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरनिवड केली होती. राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीपत्र दिलं होतं. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. पुण्यात आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील मनसे सक्रीय होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीही करण्यात आली आहे. मात्र, समीर यांच्यावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here