Bacchu Kadu Accident: आमदार बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना अपघात

Bacchu Kadu: डोक्याला आणि पायाला गंभीर इजा

0

अमरावती,दि.11: आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu Accident) यांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला आहे. त्यांना अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे.

हेही वाचा MLA Nitin Deshmukh: आमदार रवी राणांबद्दल बोलताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची जीभ घसरली

मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते आमदार कडू यांचा अपघात झाला आहे.

Bacchu Kadu Accident
आमदार बच्चू कडू

कसा झाला अपघात? | Bacchu Kadu Accident

रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघातात कडू यांच्या डोक्याला आणि पायला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर अमरावतीतल्या खासगी रुग्णालयात उचरास सुरु आहेत. दुचाकीनं धडक दिल्यानंतर बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार | Bacchu Kadu

बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवल्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेतून बाहेर पडले होते. सध्या बच्चू कडू मंत्रिपदापासून उपेक्षित आहेत. ते शिंदे-फडणवीस सरकारच्या सोबत असले तरी अधून मधून त्यांची नाराजी समोर येत असते.

आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात

दरम्यान, एक महिन्यांच्या कार्यकाळात राज्यातील तीन आमदारांच्या कारचा अपघात झाला आहे. 24डिसेंबरला भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली. या अपघातात गोरे आणि त्यांचे सहकारी जखमी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here