दूध भुकटी अपहाराप्रकरणी दोघांना न्यायालयाने केला जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.२३: दूध भुकटी अपहाराप्रकरणी दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, दिनांक २७.०३.२०२२ रोजी सकाळी १०:०० च्या सुमारास भारत बेंज कंपनीचा ट्रक त्याचा क्रमांक के.ए.३३- ए-६३६८ यामधून विक्रीसाठी बंदी असलेले नंदणी कंपनीची दुधाची पावडर मार्केट यार्ड चौक येथून सोलापूरात येणार आहे, अशी गुप्त बातमी पोलिसांना मिळाली असता, जोडभावी पेठ पोलिस स्टेशन येथील तत्कालीन पोलिसांनी नाकाबंदी करून सदरचा ट्रक पकडला असता, त्यामध्ये एकूण २५ किलो वजनाचे १२० विविध आकाराचे वेगवेगळ्या रंगाची ठिके व २० किलो वजनाचे ४ ठिके असे एकूण १२४ ठिके सापडले. Court granted bail to two in milk powder embezzlement case

त्या ठिक्यांमध्ये विक्रीस बंदी असलेली व कर्नाटकातून आलेली दूध पावडर मिळून आली. त्याप्रमाणे पोलिस सब इंन्सपेक्टर चक्रधर ताकभाते यांनी एकूण ९ आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला व अशाप्रकारे सरकारी दुध भुकटीचा अपहार करून ती भुकटी चढ्या किंमतीने बाजारात विकणाऱ्या टोळीचा छडा लावला. त्यापैकी आरोपी संजू लक्ष्मण मंजुळकर, रा. शहाबाद रोड, गुलबर्गा व अनिल राठोड, रा. बोराबंडा तांडा, यादगिर यांना सदर पोलिसांनी अटक केली.

जाहिरात

सदर आरोपी संजू मंजुळकर व आरोपी अनिल राठोड यांनी जामीनासाठीचा अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपींतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, यातील आरोपी यांनी कुठल्याही दुध पावडरची चोरी किंवा अपहार केलेला नसून, सदर दुध पावडर ही कुठल्याही फॅक्टरी मधून अथवा कुठल्याही इतर संस्थांकडून घेतलेली नसून, सदर आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये खोटेपणाने अडकवलेले आहे. तसेच सदर आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग पाहता, त्यांच्याविरूध्द कुठलाही ठोस पुरावा कोर्टासमोर मुर्त स्वरूपात आणलेला नसून, जो काही पुरावा आणला गेला आहे तो पुरावा कायद्यानुसार ग्राह्य धरता येणार नाही.

सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सदर आरोपींची रूपये ५०,०००/- जातमुचलक्यावर जामीनावर मुक्त करण्याचे आदेश केले. यात आरोपी संजू मंजुळकर तर्फे ॲड. अभिजीत इटकर तर आरोपी अनिल राठोड तर्फे ॲड. अर्जुन ठाकूर (मुंबई) यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here