सोलापूर,दि.19: Online Fraud News: ऑनलाईन आर्थिक फसवणूक (Online Payment Fraud) करण्याचे प्रमाण वाढले आहे. फसवणूक करणारे वेगवेगळ्या पद्धती वापरतात. ऑनलाईन व्यवहार करणे हा आता सर्वात पसंतीचा पेमेंट पर्याय बनला आहे. रोख घेऊन जाण्याऐवजी, लोक आता गुगल पे, पेटीएम, फोनपे सारख्या ॲप्सद्वारे पैसे देण्यास प्राधान्य देतात. मात्र आता या ॲपद्वारे देखील आपली फसवणूक केली जातेय. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट ॲप वापरत असाल तर खबरदारी घ्या, नाही तर तुमचीही होऊ शकते मोठी फसवणूक.
ऑनलाइन फसवणूकीच्या प्रमाणात वाढ | Online Fraud News
देशात स्मार्टफोनद्वारे व्यवहार करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात रोख व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र दुसरीकडे ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांदेखील वाढल्या आहेत. हे फसवणूक करणारी टोळी लोकांना चुना लावण्यासाठी सतत नवनवीन मार्ग शोधत असतात.
अशी होत आहे फसवणूक | Online Fraud News Marathi
ऑनलाइन ॲपद्वारे विविध मार्गे फसवणूक होत असताना, त्यात आता ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून तुम्हाला चुकून पैसे पाठवले आहेत, असं सांगत लोकांची फसवणूक केली जाते. अशीच एक घटना मुंबई परिसरात घडली. यामध्ये एका व्यक्तीला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पैसे दुसऱ्याला पाठवत होतो, परंतु तुम्हाला चुकून पाच हजार रुपये आले आहेत, माझे पैसे मला परत करा, तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवली आहे. हे सांगतात समोरच्या व्यक्तीने त्याने पाठवलेली रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्याच्या अकाउंट मधून पाच हजार रुपये वजा झाले. ही त्याची झालेली फसवणूक होती, हे काही वेळाने त्याच्या लक्षात आले. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक होत असल्याचं सध्या समोर येत आहे.
फसवणुकीची नवी पद्धत | Online Fraud
आजकाल तुम्हाला कोणीही एखादा अनोळखी व्यक्ती मेसेज पाठवेल आणि भासवेल की मी तुम्हाला काही पैसे पाठवले आहेत. 500 पाठवले किंवा पाच हजार पाठवले असे सांगतात. हे पैसे तुम्हाला चुकून आले असं ते तुम्हाला सांगतात. कोणी सांगत की, हे पैसे वैद्यकीय कारणासाठी मी कोणालातरी पाठवत होतो. तर यामध्ये कोणी सांगत की, मी एक विद्यार्थी आहे ते पैसे मी फीजसाठी भरत होतो, मात्र तुम्हाला चुकून आले. चांगल्या प्रकारे गुंग ठेवून विनंती करतात. मग आपल्याला वाटतं की खरंच हे चुकून पैसे आले असतील. पैसे परत पाठवण्यासाठी ते एक अप्रू लिंक पाठवतात. त्या प्री-लिंकवर क्लिक केल्यावर आपला पिन क्रमांक टाकायचा असतो. प्री वर किती पैसे आपण त्याला परत करतोय किंवा त्याचे किती पैसे द्यायचे आहेत हे काही मेन्शन नसतं. मग आपण क्लिक करत प्रोसेस कम्प्लीट करतो आणि आपल्या अकाउंट वरून त्याला पैसे जातात अशाप्रकारे हे फ्रॉड घडत आहेत, असे सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी सांगितलं आहे.
अशी घ्या काळजी
जर आपल्याला असं काही एखादा कॉल आला तर पहिला समोरच्याचा यूपीआय आयडी चेक करा. खरच पैसे आले आहेत का हे पण चेक करा. समोरच्याने पाठवलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका. कोणत्याही प्रकारचा पिन नंबर मागितला तर तोही देऊ नका. जर खरंच चुकून कोणाचे पैसे आले असतील तर त्याचा यूपी आयडी चेक करा आणि ते चेक झालं तरच कृपया व्यवहार करा, ही काळजी अशा ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी घ्यायला हवी, असे सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी सांगितले.