नाशिक,दि.8: Nashik ST Bus Accident: नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक – सिन्नर महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. नाशिक सिन्नर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या संपायच नाव घेत नाही. मागच्या आठवड्यात कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा भीषण अपघात झाला आहे.
Nashik ST Bus Accident | नाशिक-सिन्नर महामार्गावर अपघात
नाशिक-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. शिंदे पळसे टोल नाक्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती हाती येत आहे.
Nashik ST Bus Accident | अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू
नाशिक-सिन्नर (Nashik News) महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला आहे. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.

दरम्यान या ठिकाणी बघायची मोठी गर्दी जमली आहे सद्यस्थितीत हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप स्पष्ट असून यंत्रणेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल चौकात देखील असाच अपघात घडला होता. ट्रकने खाजगी बसला धडक दिली होती. अपघात झाल्यानंतर काही क्षणातच खाजगी बसने पेट घेतल्याने या 13 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान सिन्नर नाशिक महामार्गावर देखील असाच भीषण अपघात झाला असून या दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. यात महामंडळाच्या एसटी बसचा कागदासारखा पेट घेतला असून तात्काळ लोकांच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
Nashik ST Bus Accident | कसा झाला अपघात?
प्राप्त माहितीनुसार, शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील (Bus Accident) नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं. इतकंच नाही तर या बसने समोर असलेल्या एका एसटी बसला देखील जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला. त्याचवेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या.