मुंबई,दि.16: एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) केंद्रात मिळणार 2 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या (BJP) मदतीने सरकार स्थापन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिंदे आणि फडणवीस सरकारला आता 4 महिने पूर्ण होत आहे. लवकरच शिंदे गटाला आता केंद्रातून 2 मंत्रिपद आणि 2 राज्यपाल पद मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने याबाबत तशी भाजपकडे मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे. या मागणीवर आज अमित शहा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. याआधीही शिंदे गटाने केंद्राकडे मंत्रिमंडळात पदाची मागणी केली होती.
एकनाथ शिंदे गटात अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. शिवसेना, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.