ठाणे,दि.15: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी झाली. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आज ठाणे कोर्टामध्य सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाड यांच्यावरील जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला आहे. दुपारी 3 वाजता निकाल दिला जाणार आहे.
आव्हाड यांच्या विरोधात राजकिय वैमनस्यातून भाजपच्या पदाधिकारी महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून यात स्पर्श करण्यामागे तसा कोणताही कथित आरोपी तथा आपले अशील आव्हाड यांचा हेतू नव्हता. मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात गर्दी झाल्यामुळे ती बाजूला करताना त्यांनी बाजूला सरण्यास सांगताना तिला हात लागला, असे सांगत आव्हाड यांचे वकील गजानन चव्हाण यांनी घटनास्थळी असलेला व्हिडिओ देखिल न्यायालयात सादर केला. तसेच हा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकत नसल्याचा युक्तिवाद केला.
त्यावर सरकारी वकील वर्षा चंदने यांनी मात्र जमिनीला आक्षेप घेत फिर्यादी महिलेने हा प्रकार घडल्यानंतर तातडीने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगून यात राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय, वर्तकनगर च्या गुन्ह्यात 12 नोव्हेंबर रोजी दिलेल्या जमिनाच्या अटींमध्ये पुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा न करण्याची अटही, त्यांनी मोडली. जो व्हिडिओ सादर केला, त्यातही तिला स्पर्श केल्याचे स्पष्ट दिसते. आरोपी स्वतः आमदार असल्यामुळे तपासात दबाव आणण्याचीही शक्यता आहे. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. गुप्ता यांनी यावर दुपारच्या सत्रात सुनावणी घेण्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्री आले होते उद्घाटनला त्यावेळे खूप गर्दी होती चेंगराचेंगरी झाली असती. पत्रकार पडले असते लोकं पडले असते. घटनेच्या आधी देखील धक्काबुक्की झाली होती. ही सर्व राजकीय खेळी आहे. जितेंद्र आव्हाड पहिल्यांदा निवडून आले तेव्हा 15 हजार मतांनी निवडून आले. दुसऱ्यांदा 50 हजार मतांनी निवडून आले. तिसऱ्यांदा 75 हजारांनी निवडून आले. हेच काही जणांना आवडत नाही. जितेंद्र आव्हाड मंत्री राहिलेयत, आव्हाड गेली 15 वर्षे आमदार आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप / शिंदे गट यांत जे वाद सुरु आहे हे आपण रोज बघतोय. याचाच हा एक राजकीय भाग आहे की गुन्हे दाखल केले जात आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.