Live-in Partner Murder: मुंबईतील तरुणीची प्रियकराने दिल्लीत केली हत्या, शरीराचे केले 35 तुकडे

Live-in Partner Murder: आफताब अमीन पूनावाला, असे आरोपी तरुणाचे तर, श्रद्धा असे खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे

0

नवी दिल्ली,दि.14: Live-in Partner Murder: चित्रपट अथवा एखाद्या मालिकांमध्ये थंड डोक्याने खून केल्याचं आपण पाहिलं आहे. तसाच खळबळजनक प्रकार दिल्लीत समोर आला आहे. आफताब अमीन पूनावाला असे आरोपीचे नाव आहे. दिल्लीमध्ये अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना घडली आहे. या विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे.

आफताब अमीन पूनावाला, असे आरोपी तरुणाचे तर, श्रद्धा असे खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आफताब पूनावालाला अटक केली आहे.

दोघांची भेट ही मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. पण, घरच्यांचा विरोध होत असल्यामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले. दिल्लीमध्ये छतरपुर दोघे एकत्र राहत होते. श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करत होते.

पण, अचानक श्रद्धाचा काही दिवसांपासून संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीयांना संशय बळावला. श्रद्धाचे वडील दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी तिचा शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना सुरुवातीला कोणतीची माहिती मिळाली नाही. पण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्याच एका खबऱ्याकडून माहिती मिळाली आणि आफताबला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सुरुवातील आफताबने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच आफताबने गुन्ह्याची कबुली दिली. दिल्लीत आल्यावर श्रद्धाने लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यावरून आमच्यामध्ये भांडणं होत होती. मे महिन्यात आमच्यामध्ये असंच भांडणं झालं, त्यामुळे रागाच्या भरात तिचा खून केला. तिचा खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरिराचे 35 तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिले, अशी कबुली आफताबने दिली.

पोलिसांनी सांगितलं की, श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर सुऱ्याने तिच्या शरिराचे 35 तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने नवीन फ्रीज खरेदी केलं होतं. 18 दिवस त्याने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. रात्री 2 वाजता तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुकडे गोळा करत होता आणि बाहेर जाऊन फेकून येत होता. पोलिसांनी आफताब विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here