Dombivali Crime: व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला 40 लाखांना लुटलं

0

डोंबिवली,दि.4: Dombivali Crime: व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांनीच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला 40 लाखांना लुटल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करुन त्याच्या मित्रांनीच चाळीस लाखाचे दागिने उकळल्याचा प्रकार समोर आला आगे. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये नशेचे औषध टाकून या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी तरुणाला पाजले. त्यानंतर एका तरुणीसोबत त्याचा अश्लील व्हिडीओ काढून घेतला. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) करण्याचे नावाखाली तरुणाकडून दोन वर्षात चाळीस लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम सोने उकळले. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) इंजिनिअरिंगचा शिक्षण घेणारा डोंबिवलीतील तरुणासोबत हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी (Tilak Nagar Police) एका आरोपीला अटक केली आहे. संजय राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले मात्र कॅमेरासमोर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

डोंबिवलीत राहणारा एक तरुण कोल्हापूरमधील एका मोठ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. 2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत एका फार्महाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी पीडित तरुणाच्या मित्रांनी सॉफ्ट ड्रिंक्समध्ये गुंगींचे औषध टाकून त्याचे एका तरुणीसोबतचे अश्लील व्हिडीओ काढले. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याचे सांगत त्या तरुणाला धमकावले. पीडित तरुणाला सातत्याने धमकावत त्याच्याकडून चाळीस लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम वजनाचे दागिने लाटले आहेत. हे कृत्य करणारे पीडित तरुणाचे मित्रच होते. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव संजय राजपूत असे आहे. तो कोल्हापूर येथील इचलकरंजी येथे राहणार आहे.

पोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना

या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहे. त्यात त्यांचा काय सहभाग आहे याबाबत पोलिसांकडून त्याचा तपास सुरु आहे. तपसासाठी टिळकनगर पोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी आणि आरोपींच्या जाब जबाबात तफावत येत असल्याने पोलिस अन्य अंगानेही या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here