Shivneri Bus Caught Fire: नाशिक-पुणे महामार्गावर शिवनेरी बस पेटली, थोडक्यात टळला अनर्थ

0

नाशिक,दि.2: Shivneri Bus Caught Fire: नाशिक-पुणे महामार्गावर शिवनेरी बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. पुण्यात काल (दि.1) बर्निंग बसचा थरारक घटना पाहण्यास मिळाली होती. येरवडा परिसरामध्ये एसटी महामंडळाची शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने या बसमधील 42 प्रवासी हे वेळीच खाली उतरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना ताजी असताना आता नाशिक पुणे महामार्गावर आणखी एका शिवनेरी बसने पेट घेतला आहे. (Shivneri Bus Caught Fire)

नाशिक पुणे महामार्गावर चालत्या एसटी बसने पेट घेतला. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या शिवनेरी बसने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. नाशिकहून ही बस पुण्याला जात होती. पण अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे लगेच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली.

प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला. बघता बघता बसला भीषण आग लागली. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूने वाहनं थांबवण्यात आली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे. मात्र, या दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here