ACB ने प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

0

सोलापूर,दि.31: ACB ने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. किरण लोहार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 25 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. किरण लोहार यांच्या सोबतच चैतन्य भागातील एका लिपिकास यावेळी पकडण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन किरण लोहार यांना साधारण 13 महिने झाले होते. मात्र त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या.

शेवटी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा हातोडा पडलाच. या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे त्यांच्या यूडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी यांनी 25000 देण्याचे ठरले मात्र तक्रारदार यांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात पाच वाजून 45 मिनिटांनी त्यांना 25000 घेतल्याचे रंगेहात पकडण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here