Vijayawada Fire: विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग, 2 जणांचा होरपळून मृत्यू

0

विजयवाडा,दि.23: Vijayawada Fire: विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शहरात जागोजागी फटाक्यांचे मोठे स्टॉल लागले आहेत. यामुळे फटाक्यांच्या स्टॉलला आग लागण्याच्या घटना घडत असतात. आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग लागली आहे. आग लागल्यानंतर फटाक्यांनीही पेट घेतला आणि काही क्षणात आगीनं भीषण रुप धारण केलं. सध्या घटनास्थळीअग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

विजयवाडामध्ये लागलेल्या आगीत तीन दुकाने पूर्ण जळून खाक झाली आहेत. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे इतर दुकांनाना आगीपासून वाचवले. आग लागल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. स्थानिक आमदार मल्लाी विष्णू आणि पोलिस आयुक्त के. आर टाटा यांनी घटनास्थळी भेट दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here