Raj Thackeray Eknath Shinde: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

0

मुंबई,दि.15: Raj Thackeray Eknath Shinde: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत हे देखील उपस्थित होते. या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट नेमकी कशासाठी आहे, हे अद्याप उघड झाले नसले तरी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांनाही उधाण आहे.

साडेतीनच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचं प्रमुख कारण असलं तरी यात राजकीय चर्चा होणार नाही, असं होऊ शकणार नाही. आरोग्यविषयक चर्चेसोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे.

वर्षा बंगल्यावरील या भेटीला एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासोबतच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्यात राजकीय चर्चा होणार हे साहजिक आहेत. आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत त्यांच्यात चर्चा होते का, चर्चा झालीच तर त्याचा तपशील काय याची उत्सुकता लागली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here