चुकूनही गुगलवर हे सर्च करणे पडू शकते महागात

0

दि.१४:कुठलेही माहिती हवी असल्यास अनेकजण Google वर सर्च करतात. Google माहिती लगेच मिळते. पर्यटन स्थळाविषयी, शहराविषयी, ऐतिहासिक माहिती करिता अनेकजण गुगलवर सर्च करतात. परंतु, अशा काही गोष्टी आहेत. त्या गुगलवर सर्च करणे चांगलेच महागात पडू शकते. गुगलवर अशा ५ गोष्टी कधीच सर्च करू नका. अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.

बॉम्ब बनवण्याची पद्धत

सध्या दहशवादी कारवाया वाढल्या आहेत. म्हणून गुगलनेही यासंबंधी कठोर पाऊलं उचलली आहेत. बॉम्ब बनवण्याची पद्धत तुम्ही जर सर्च केली तर तुम्हाला ते महागात पडू शकते.

चाइल्ड पोर्न

चाइल्ड पोर्न बनवणे आणि पाहणे हे दोन्ही बेकायदेशीर आहे. असे करताना सापडल्यास जेलची हवा खावी लागू शकते. गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधी सर्च केल्यास आयपी ॲड्रेस वरून तुमची ओळख पटू शकते. त्यानंतर तुमची जलेची हवा पक्की ठरू शकते.

गर्भपात कसा करावा

गुगलवर हाऊ टू अबॉर्ट टाइप करणे हे जीवघेणे ठरू शकते. गुगलवर यासंबंधीच्या अशा अनेक माहिती मिळतील. त्याने तुम्ही अडचणीत याल. त्यामुळे या गोष्टीपासून तुम्ही दूर राहणे कधीही चांगलेच आहेत. या संबंधिची माहिती कधीच सर्च करू नका.

शॉपिंग ऑफर्स

गुगलवर ऑनलाइन शॉपिंग ऑफर्स संबंधी सर्च करणे महागात पडू शकते. कारण, गुगलवर अनेक फेक वेबसाइट्स तुम्हाला मिळतील. ज्यावर ऑफर्सच्या आडून तुम्ही सायबर गुन्हेगाराच्या तावडीत सापडू शकता.

आजारपणाचे औषध

गुगलवर कोणत्याही आजाराचे औषध सर्च करणे चांगलेच महागात पडू शकते. त्यात तुमचा जीव सुद्धा जावू शकतो. त्यामुळे आजारपणावर उपचार करायचे असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणे हेच फायदेशीर आहे. गुगलवर सर्च करून घरच्या घरी उपचार करणे तुमच्या जीवावर बेतू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here