मुंबई,दि.6: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला याचा निर्णय उद्या लागणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.
शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वी दोन्ही गटानं पक्ष चिन्हाची तयारी सुरु केली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यष्यबाण निशाणी हवी आहे. पण धन्यष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं तर दोन्ही गटानं प्लॅन बी तयार ठेवलाय का? कारण बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्षचिन्हाचं संकेत देण्यात आले आहेत.
शिंदे गटाची निशाणी “तलवार” असू शकते तर ठाकरे गटाची निशाणी “गदा” हे चिन्ह असू शकते. बुधवारी झालेल्या या दसरा मेळाव्यात दोन्ही गटानं जवळपास चिन्हांसाठी प्लॅन बी तयार केलाय की काय असंत वाटत होतं. हिदुत्वांचे विचार पुढे घेऊन निघालेले दोन्ही गट एकमेकांवर प्रहार करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत आणि युद्धात लागणा-या शस्त्रांचा वापर दोन्ही गट निवडणुक चिन्ह म्हणून वापरण्याची शक्यता आहे. बीकेसीमध्ये तलावारीचं पुजन करून दस-या मेळाव्याला सुरुवात केली तर दुसरीकडे विरोधकांवर शिवतीर्थावर देखील शस्त्रपुजन करण्यात आलं पण प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करताना गदेचा वारंवार उल्लेख करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांचा बीकेसी येथे झालेल्या दसरा मेळाव्यात 51 फूट तलवार दिसली होती. तलवारीचं भलमोठं लॅान्चिंग करण्यात आलं. मंचाच्याखाली भलीमोठी 51 फूट लांब तलवारीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी 12 फुट लांब चांदीची तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिली. आता एवढ्या मोठ्या सोहळ्यात धनुष्यबाणाचं लॅाचिंग करता आलं असतं पण तसं न करता खास तलवारीवर लक्ष केंद्रीत कसं होईल यावर भर देण्यात आला.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. पण जर हे चिन्ह गोठवलं तर इतर चिन्ह काय असतील याचा अभ्यास दोन्ही गटाकडून पुर्ण झालाच असेल. निवडणुक आयोग धनुष्यबाणाचं काय करेल हे आताच सांगता येत नाही. पण दोन्ही गट मात्र नव्या चिन्हाच्या तयारीत दिसत आहेत.
बुधवारी शिवतीर्थवर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाधडली. उद्धव ठाकरे वारंवार विरोधकांवर हल्लाबोल करत होते. पण यावेळी त्याच्या अनेक वाक्यांमध्ये गदेचा उल्लेख होता.