दि.12: PF खातेधारकांसाठी चांगली बातमी. यंदाची त्यांची दिवाळी ( Diwali) अधिक गोड होणार आहे. PFवरील व्याजाची रक्कम लवकरच बँकेत जमा होणार आहे. 6 कोटीहून अधिक ग्राहकांना या लाभ मिळणार आहे. दिवाळीआधीच पैसे जमा होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO 6 कोटी ग्राहकांच्या खात्यात 2020-21 वर्षाचं 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करणार आहे. याची घोषणा लवकरच होऊ शकते. प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. कामगार मंत्रालयानेही या निर्णयाला संमती दिली आहे. आता EPFO लवकरच ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज रक्कम जमा करेल. ही रक्कम दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, सांगितले जात आहे.
EPFOने केले खातेधारकांना सतर्क
EPFOने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे ॲप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने ट्विटरवर अलर्ट जारी करताना म्हटले आहे की, ‘ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकाला कोणताही फोन कॉल करत नाही.
गेल्या 7 वर्षांतील सर्वात कमी व्याज दर
EPFOने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी केवळ 8.5 टक्के व्याजदर चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता, जो गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षात देखील व्याज समान होते. त्याचबरोबर, 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज ईपीएफवर उपलब्ध होते आणि 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आले होते. वास्तविक, 2019-20 या आर्थिक वर्षात, केवायसीमधील अडथळ्यामुळे, अनेकांना 8-10 महिन्यांनंतर व्याज मिळाले.
या सोप्या पद्धतीने व्याज तपासा
EPFO मध्ये व्याजाचे पैसे तपासण्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. तसे, ईपीएफओकडून व्याज हस्तांतरणाविषयी माहिती प्रत्येक ग्राहकाला मेसेज पाठवून दिली जाते. परंतु, तुम्ही स्वतः एक मेसेज पाठवून खात्यातील शिल्लक माहिती सहज मिळवू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलवर ‘EPFOHO UAN ENG’ टाइप करून 7738299899 वर पाठवावे लागेल. मेसेजची शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत.
जर तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती हिंदीत घ्यायची असेल तर तुम्ही ‘EPFOHO UAN HIN’ लिहून पाठवू शकता. परंतु खातेधारकांना हे लक्षात ठेवावे लागेल की हा मेसेज त्याच मोबाईल फोनवरून पाठवा ज्याचा क्रमांक यूएएनमध्ये नोंदणीकृत आहे. याशिवाय, 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरूनही माहिती मिळवू शकता. यानंतर तुम्हाला EPFO कडून एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या PF खात्याचा तपशील मिळेल.