नांदेड,दि.11: एका 40 वर्षीय विवाहितेवर पुजाऱ्याने (Priest) सहा वर्षे अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नांदेड शहरातील गोपाळ चावडी परिसरातील एका देवीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याने एका विवाहितेवर (Married Woman) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीनं आपल्याला खास तुझ्यासाठी देवानं पाठवलं आहे, असं म्हणत तब्बल सहा वर्षे अत्याचार केले आहेत. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पीडित महिलेच्या 20 वर्षीय मुलीवर देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
श्रीपाद देशपांडे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पुजाऱ्याचं नाव आहे. आरोपीनं 2015 पासून पीडित महिलेला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, नराधम आरोपी हा नांदेड शहरातील गोपाळ चावडी परिसरातील एका देवीचा पुजारी आहे. 2015 साली आरोपी पीडित महिलेच्या घरी आला होता. दरम्यान पीडित विवाहित महिला आंघोळ करत होती. यावेळी आरोपीनं चोरून पीडितेचे अश्लील फोटो आपल्या मोबाइलमध्ये काढले.
यानंतर आरोपीनं संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 40 वर्षीय विवाहित महिलेवर अनेकदा अत्याचार केले आहे. दरम्यान पीडितेनं विरोध केला असता, ‘मी महाराज आहे, मला खास तुझ्यासाठी देवानं पाठवलं आहे. त्यामुळे मी जसं म्हणेल, त्याचप्रमाणे तू वागलं पाहिजे’ असं म्हणत आरोपीनं विवाहितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. यातून पीडित महिला गर्भवती देखील राहिली होती. पण आरोपीनं देशपांडे याने तीन वर्षांपूर्वी पीडित महिलेच्या पोटात लाथ मारून तिचा गर्भपात केला आहे.
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडित महिलेच्या 20 वर्षीय मुलीवर देखील अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पीडित महिलेचे अश्लील फोटो तिच्या मुलीला पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी श्रीपाद देशपांडे विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.








