या कारणामुळे 6 जणांना सोडले, NCB ने सांगितले कारण

0

मुंबई,दि.9: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) NCB च्या कारवाईवर गंभीर आरोप केलेत. NCB ने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. काही वेळांपूर्वीच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलं. त्यानंतर एनसीबीनं ही पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही पत्रकार परिषद एनसीबी अधिकारी समीर वानखेडे तसंच NCB चे एडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली आहे.

एकूण 14 जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आणलं गेलं. यापैकी 6 जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले, असं एनसीबीनं मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. तसंच सोडण्यात आलेल्या 6 जणांची नावे देता येणार नाही असं सांगत प्रकरण कोर्टात सुरु आहे, अशी माहिती एनसीबीनं दिली आहे. 1 तारखेच्या कारवाई नंतर 6 ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाईत 10 जणांना अटक केली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते, असं म्हटलं आहे.

NCB भारतातून अंमली पदार्थ हद्दपार करत असल्याचं एनसीबीनं म्हटलं आहे. तसंच मुंबई NCB टीम ने मोठी कारवाई केलीय. क्रुझ पार्टीवर आम्ही कारवाई केली. यांत 8 जणांना अटक करण्यात आली. 9 साक्षीदार होते. अटक करण्यात आलेल्या लोकांना NCB कधीच ओळखत नव्हती. 2 तारखे आधी म्हणजेच कारवाई आधी या साक्षीदारांना कधीच ओळखत नव्हती, असं एनसीबीनं स्पष्टपणे सांगितलं आहे.तसंच आरोपींना घेऊन जाण्यास मनिष भानूशाली यांना कोणीही आदेश दिले नव्हते, असंही एनसीबीनं स्पष्ट केलं आहे. कॅमेऱ्याची गर्दी होती म्हणून त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहिती एनसीबीनं पत्रकार परिषदेत दिली आहे.

किरण गोसावी यानं जे सांगितलं तेच आम्ही नोंदवलं. NCB जात धर्म आणि भाषेनुसार काम करत नाही. आम्ही पुराव्या आधारावर बोलतो, असंही म्हटलं आहे. आम्हाला जे काही बोलायचे ते कोर्टात बोलणार असल्याचंही एनसीबीनं स्पष्टपणे सांगितलं आहे.

सगळ्या प्रक्रिया कायदेशीर रित्या पार पाडल्या गेल्या. तपासात आढळलेल्या पुराव्यांमुळे न्यायालयाने आरोपींना NCB कोठडी सुनावली होती. विविध प्रकारचे अंमली पदार्थ सापडले होते. NCB वर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचंही एनसीबीनं म्हटलं आहे. कारवाई दरम्यान तात्काळ साक्षीदार तयार करावे लागतात, अशी माहितीही एनसीबीनं दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here