Pradeep Patwardhan Passed Away: लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

0

मुंबई,दि.९: Pradeep Patwardhan Passed Away: लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन (Pradeep Patwardhan Death) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी ०९ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील राहत्या घरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं.

प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात स्थायिक होते. महाविद्यालयापासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय साकारण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा व्यावसायिक रंगभूमीकडे वळवला. मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका फार गाजली. त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ अशा चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती.

प्रदीप पटवर्धन यांनी एक फुल चार हाफ (१९९१), डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट. पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला अशा अनेक चित्रपटातूनं भूमिका साकारली होती. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here