मुंबई,दि.५: शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र लिहिले आहे. आता रडायचं नाही तर लढायचं असे त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला एक पत्र लिहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात संसदेत आणि बाहेर माझ्या समर्थनार्थ आवाज उचलला. आता रडायचं नाही तर लढायचं अशा शब्दात राऊतांनी बाळासाहेबांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
राऊतांनी पत्र लिहिलंय की, अडचणीच्या काळात तुमच्यासोबत कोण आहे हे कळतं. केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावापुढे मी झुकणार नाही. अंतिम श्वासापर्यंत मी लढत राहीन. कुठल्याही प्रकारच्या दबावापुढे मी शरण जाणार नाही. योग्य वेळ आल्यावर आमचाच विजय होणार आहे. आमच्या विचारांचा विजय होईल आणि देश योग्य दिशेने पुढे जाईल असंही त्यांनी सांगितले आहे.
त्याचसोबत आता धैर्याने काम करावं लागेल. संयम ठेवावा लागेल. परंतु वेळ आल्यानंतर बाजी आमचीच असेल. पत्राद्वारे राऊतांनी काँग्रेस, सीपीएम आणि अन्य विरोधी पक्षांचे धन्यवाद मानले आहेत. न्यायासाठी माझी लढाई सुरूच राहील. वंदनीय हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे रडायचं नाही लढायचं. या लढाईत मला साथ दिल्याबद्दल मी आभारी आहे असं पत्र राऊतांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पाठवलं आहे.
संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मध्यरात्री अटक केली होती. सायंकाळी ५:३० पासून त्यांची ईडी कार्यलयात चौकशी सुरू होती. यानंतर आता त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली.