शिवसेना नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

0

मुंबई,दि.1: न्यायालयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मध्यरात्री अटक केली आहे. सायंकाळी 5.30 पासून त्यांची ईडी कार्यलयात चौकशी सुरू होती. यानंतर आता त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली.

सक्तवसुली संचालनालयाने आठ दिवसांसाठी संजय राऊत यांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना केलीय.

न्यायालयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने आठ दिवसांच्या कोठडीची गरज नाही असे म्हटले. आरोपी सहकार्य करत नाही असे सकृतदर्शनी दिसून येत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना 11 वाजून 38 मिनिटाला अटक करण्यात आल्याचं ईडी सूत्रांनी सांगितलं आहे. ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित आहे. काही वेळापूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना बोलून घेतलं होतं. ईडी कार्यालयातून बाहेर येताना ते काही कागदपत्रे आपल्यासोबत बाहेर घेऊन आले. जे राऊत यांना अटक करण्यात आल्याचं मेमो असल्याचं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबई ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यांचे हस्ताक्षर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here