मुंबई,दि.९: शुक्रवारी एसीबीच्या (ACB) पथकाने सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील (ACP Sujata Patil) यांना अटक केली. सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना ४० हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले. पाटील सध्या जोगेश्वरीच्या मेघवाडी विभागातील एसीपी म्हणून कार्यरत आहेत. भाडेकरूने कब्जा केलेली जागा परत मिळवून देण्यासाठी तसंच गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पाटील यांनी १ लाख लाच मागितली होती. यातील ४० हजार रुपये स्वीकारताना पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील (ACP Sujata Patil) या लाच मागत असल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि लाच घेताना पाटील यांना पकडलं.
काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक यांना एसीबी पथकाने दोन लाख रूपयांची लाच घेताना सप्टेंबर महिन्यात अटक केली होती.