सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत घट तर जिल्हा ग्रामीणमध्ये मोठी वाढ

0

सोलापूर,दि.12: सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण संख्येत कधी वाढ तर कधी घट होत आहे. शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहर 202 अहवाल प्राप्त झाले. यात 189 निगेटिव्ह तर 13 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 8 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 113 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 34 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 34000 झाली आहे. तर यापैकी 32378 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1509 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 963 पुरुष व 546 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 243 अहवाल प्राप्त झाले, यात 193 निगेटिव्ह तर 50 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 33 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 137 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 13 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 186366 झाली आहे. तर यापैकी 182500 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3729 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2422 पुरुष व 1307 महिलांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here