आमदार दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली किरीट सोमय्या यांची तक्रार

0

मुंबई,दि.7: आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची तक्रार केली आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्वीकारला.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर फोटो पोस्ट करून त्यांनी उद्धव ठाकरेंना माफिया मुख्यमंत्री म्हटले. यावर शिंदे गटाने जोरदार आक्षेप नोंदविला आहे.

महाराष्ट्र माफिया मुक्त करण्याचा मागील अडीच वर्षांपासून आमचा संघर्ष सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने तो पूर्ण झाला. याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी आज मंत्रालयात आलो होतो, असं किरीट सोमय्या म्हणाले. तसेच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या दापोलीमधील रिसॉर्टविरोधातील कारवाई राज्य सरकारने सुरु ठेवावी, अशी विनंती मी एकनाथ शिंदे यांना केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. 

मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हटविल्या बद्दल अभिनंदन केले, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. परंतू यावरून आता शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. किरीट सोमय्या यांनी माफिया असा शब्द वापरणे चुकीचे असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

यावर स्पष्टीकरण देताना सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी मला, माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. नवनीत राणांना तुरुंगात टाकले होते. यामुळे मी त्यांना माफियाच म्हणतो, असे ते म्हणाले. तर केसरकर यांनी यावर आक्षेप घेत आमच्यात मतभेद असले तरी उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करायची नाही असे ठरलेले आहे. किरीट सोमय्या जे बोलले आहेत ते आक्षेपार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी मी यावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतू होऊ शकला नाही. परंतू देवेंद्र फडणवीसांना आक्षेप कळविला आहे. त्यांना किरीट सोमय्यांना आवर घालण्यास सांगितले आहे. आमच्यात जे काही ठरले आहे, त्यानुसार भाजपा नेत्यांनी वागावे, असे फडणवीसांना सांगितले असल्याचे केसरकर म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here