मुंबई,दि.20: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज झाली, असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली होती. भाजपाने पाच जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रसेचे चंद्रकांत हिंडोरे पराभूत झाले आहेत.
काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला. चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार भाई जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधान परिषद निवडणुकीचे बहुतांश निकाल हाती आले असून, काँग्रेसची 3 मते फुटल्याची माहिती देण्यात आली आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत झाली आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश दिला आहे. भाजपाने पाच जागांवर विजय मिळवला आहे.
भाजपला 133 मते मिळाली
भाजपच्या उमेदवारांना 133 मते मिळाल्याची माहिती भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली. प्रवीण दरेकर यांना 29, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना प्रत्येकी 30 तर उमा खापरे यांना 28 मते मिळाली असून, प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची 17 मते मिळाल्याचे भातखळकर यांनी सांगितले.