सातारा,दि.१७: हे लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील कर्मचारीही त्यांना ओळख देत नाहीत असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या टीकेला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. यावेळी उदयनराजे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे.
हिंमत असेल तर समोरासमोर या, आपण दोघेही ईडीच्या चौकशीला जाऊ. पहिली चौकशी माझी होऊ द्या असे खुले आव्हान उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता दिले आहे. “माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करता, पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. मंत्री, संत्री कोण काय बोललं मला माहित नाही. खंडणी, टक्केवारीची भाषा करता, पण हिंमत असेल तर समोरासमोर ईडीच्या चौकशीला आपण दोघेही सामोरे जाऊ. पहिली चौकशी माझी होऊ द्या,” असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
साताऱ्यातील एमआयडीसीचा विकास हा टक्केवारीच्या नेत्यांमुळे रखडला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही. मंत्री, संत्री असतील; त्याचे मला काहीही घेणे देणं नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. लाख, दोन लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप करण्याची काय पद्धत झाली काय,” अशी विचारणा उदयनराजेंनी केली.