दि.5 : सोमवारी (दि.4) WhatsApp, Facebook व Instagram सेवा खंडित झाली होती. जगभर अनेक युजर्सना त्रास सहन करावा लागला होता. जगभरातील यूजर्सचे मेसेज, कॉल्स, इतकंच काय तर ऑफिसचं कामसुद्धा ठप्प झालं. एकमेकांशी संवाद साधणं कठीण झालं. काही तज्ज्ञांच्या मते असं इतिहासात पहिल्यांदाच घडलं ज्यामध्ये सोशल मीडियावरील काही महत्त्वाच्या आणि कोट्यवधी यूजर्स असलेल्या अप्लिकेशन्स इतका वेळ बंद होत्या. या सर्व फेसबुकच्या मालकीच्या अप्लिकेशन्स बंद होण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. पण आता यामध्ये एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. ‘थॉमस’ मुळे संपूर्ण जगाला आणि कंपनीला या आउटेजचा सामना करावा लागला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा थॉमस नक्की आहे तरी कोण? खरं म्हणजे थॉमस हा अमेरिकेतील एक मोठा हॅकर (Hacker) आहे. त्यानं या आधी अनेकमोठमोठ्या सिस्टम हॅक केल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक सायबर गुन्हे दाखल आहेत. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा FBI नं ही माहिती दिली आहे. लवकरच FBI थॉमसला ताब्यात घेणार आहे. यासंबंधीची संपूर्ण जबाबदारी FBI अधिकारी जॉन मैकक्लेन यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप बंद पडल्यामुळे अनेक लोकांना मेसेज पाठवण्यासाठी अडचणी येत होत्या तर काही लोकांचं लॉगीन होऊ शकतं नव्हतं. कित्येक लोकांना अप्लिकेशनची किंवा फोची एरर असेल असा अंदाज लावून अप्लिकेशन्स Uninstall केल्या. याचा फटका कंपनीला बसला. अनेक कंपन्यांचं काम या अप्लिकेशन्समुले चालतं त्यामुळे अशा कंपन्यांना वेळेचं आणि आर्थिक नुकसान सहन करावं लागलं.